शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला.या सत्कारानंतर संजय राऊतांनी पवारांवर आगपाखड केली.शरद पवारांनी सत्कार सोहळ्याला जायला नको होतं असा सल्लाही दिला.मात्र या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय.दिल्लीत शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला ठाकरे गटाचा खासदार संजय दिना पाटील यांनीही हजेरी लावली होती.संपूर्ण सोहळा संपेपर्यंत संजय दिना पाटील यांनी कार्यक्रमात बसून राहिले.विशेष म्हणजे सोहळ्यानंतर श्रीकांत शिंदेंकडून आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमालाही संजय दिना पाटील गेले होते.