काल झालेल्या सत्कार सोहळ्यात शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केलं.एकनाथ शिंदे यांनी आपली कारकीर्द ठाणे महापालिकेपासून सुरू केली.ज्या दिग्गजांनी ठाण्यात चांगलं काम केलं ते काम एकनाथ शिंदे यांनी पुढे नेलं. असं पवार म्हणाले होते.त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय.ठाण्याचा विकास शिंदेंनी नाही, ठाकरेंच्या शिवसेनेनं केल्याचं राऊतांनी म्हटलंय..