सेन्सेक्स आणि निफ्टीची बुधवारी रोलर कोस्टर सफर सुरू होती. कधी एकदम वर तर पुढच्या क्षणी एकदम तळाला अशी या निर्देशांकांची अवस्था होती. Money Time मध्ये NDTV मराठी डिजिटलचे संपादक श्रीरंग खरे यांनी ही परिस्थिती का निर्माण झाली हे तज्ज्ञांच्या मदतीने समजावून सांगितले. या कार्यक्रमात गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण यांनी अशा विचित्र बाजारात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मल्टीकॅप ज्यांना फ्लेक्सीकॅप फंड म्हणूनही ओळखले जाते, त्यातील गुंतवणूक का फायदेशीर ठरू शकते हे सांगितले.