गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव वाढला आहे. विशेषतः आता दोन दिवसांपूर्वी चामोर्शी तालुक्यात टस्कर हत्तींनी शिरकाव केल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे रानटी हत्ती केवळ पिकांची नासधूस करत नसून, घरांमध्येही घुसून नुकसान करत असल्याने स्थानिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.