महाराष्ट्रातील सत्ताधारी 'महायुती' सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. "सरकार कलंकित झालंय, महाराष्ट्राला डाग लागला आहे," अशा तीव्र शब्दांत त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. गेल्या काही काळापासून राज्यातील घडामोडींवरून महायुती सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या राऊत यांनी, नुकत्याच घडलेल्या मंत्रिमंडळातील खातेबदलांचा आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील माजी एटीएस अधिकाऱ्याच्या दाव्याचा संदर्भ देत सरकारची प्रतिमा डागाळल्याचे म्हटले आहे.