राज्यात सध्या आरक्षणावरून मोठा वाद पाहायला मिळतोय. प्रत्येक समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतोय. मराठा, धनगर आणि बंजारा समाजाची आरक्षणासाठी आंदोलनं सुरुयत. दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील तरुणाई सध्या सुरू असलेल्या या आरक्षणच्या प्रश्नाकडे कशी पाहतेय? या वादामुळे महाराष्ट्राच्या विकासाची गाडी खरंच पुढे सरकणार आहे का? तसेच ग्रामीण भागात या संघर्षामुळे सामाजिक तणाव वाढतोय का? या सगळ्याविषयी कायद्याचे शिक्षण घेणारे, डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी