गौरी पूजन आणि विसर्जनानंतर गावी गेलेले चाकरमानी आणि गणेशभक्त आता मुंबई, पुणे आणि इतर शहरांकडे परतू लागल्याने सातारा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खंडाळा परिसरात तब्बल १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून अनेक वाहनचालक आणि प्रवासी तासन्तास महामार्गावर अडकून पडले आहेत. खंडाळा ते खंबाटकी घाट परिसरात वाहनांची अक्षरशः रीघ लागली असून, गाड्या एकाच ठिकाणी ठप्प झाल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
Traffic jam on Satara highway after Gauri immersion, queues of vehicles up to 12 km in Khandala