गणेशोत्सवानंतर Mumbai-Goa Highway वर वाहतूक कोंडी, इंदापूरमध्ये 7 ते 8 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर परिसरात भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीमुळे वाहनांच्या तब्बल ७ ते ८ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून मुंबईच्या दिशेने परतणारे हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येताना जशी अनेक तास वाहतूक कोंडी सहन करावी लागली होती, तसाच अनुभव आता परतीच्या प्रवासातही येत आहे. अनेक ठिकाणी वाहनांना ४ ते ५ तासांपेक्षा अधिक वेळ एका जागी थांबावे लागत असल्याने प्रवाशांचा संयम सुटताना दिसत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत असून महामार्गावर वाहतुकीचा ताण अद्याप कायम आहे. Traffic jam on the Mumbai-Goa Highway following Ganeshotsav; queues of vehicles stretch for 7 to 8 km in Indapur.

संबंधित व्हिडीओ