गणेशोत्सवासाठी महामुंबईतून कोकणातील मूळ गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांची लगबग सुरू झाली असली तरी यंदा प्रवासाचे नियोजन अनेकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून सुटणाऱ्या एसटीच्या ५६२ नियमित बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दुसरीकडे कोकण रेल्वे मार्गावरील नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांमधील आरक्षित तिकिटेही रिग्रेट झाल्याने कोकणवासीयांची चिंता वाढली आहे. यंदा 14 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत असल्याने ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असेल. त्यामुळे रेल्वे आणि एसटी या दोन्ही वाहतूक सेवांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे