बीडमधील जिल्हा नियोजन समितीची बैठक अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तब्बल अडीच तास ही बैठक सुरू होती.बीडमधील चुकीच्या कामांची चौकशी होणार असे निर्देश अजित पवारांनी बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिलेत.अतिरिक्त कामं कशी मंजुर केली असा सवालही त्यांनी केला.बीडमधील कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही.तसंच यापुढे कामे बघूनच कंत्राटदारांना बिले अदा करा अशा सूचना अजित पवारांनी दिल्यात.जर तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा असंही अजित पवारांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलंय..