Ulhasnagar Crime News | उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये किरकोळ वादातून कारखानदारावर प्राणघातक हल्ला । NDTV
Ulhasnagar Crime News, Factory owner attacked with intent to k**l following a minor dispute in Ulhasnagar Camp 5,
उल्हासनगर कॅम्प-५ येथील गायकवाड पाडा परिसरात किरकोळ कारणावरून एका कारखानदारावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दिलीप कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज कुशवाहा, आकाश कुशवाहा आणि त्यांच्या काही साथीदारांनी दिलीप कुमार यांच्या कारखान्यात प्रवेश करून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.