दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोली यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपण आदित्य ठाकरे यांना कधीच भेटलो नसल्याचा दावा करत या प्रकरणाशी संबंधित अनेक गोष्टी योग्य व्यासपीठावर मांडणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सुशिक्षित आणि निष्पक्ष पत्रकार अथवा मुलाखतकाराकडून कोणतेही, अगदी कठीण प्रश्न विचारले गेले तरी त्यांना सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या नव्या पोस्टनंतर दिशा सालियन प्रकरणातील चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे.