BJP ने चोरलेलं अर्थमंत्रीपद परत दिलं नाही, MLA Rohit Pawar यांची भाजप, NCP वर टीका | NDTV मराठी

बीडमध्ये आमदार रोहित पवारांनी अर्थमंत्रीपदावरून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसवरच निशाणा साधलाय.. भाजपाने राष्ट्रवादीचं अर्थमंत्रीपद चोरलं आणि ते अद्याप परत दिलं नाही, असा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय.. भाजपा फसवं आहे, हे आम्ही आधीपासून सांगत होतो, म्हणूनच भाजपासोबत गेलो नाही, असंही त्यांनी म्हटलंय... दादांनी अर्थमंत्रीपद स्वतःकडे का ठेवलं होतं, याचं कारण आता स्पष्ट झालंय, असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. मात्र राष्ट्रवादीला चोरलेलं अर्थमंत्रीपद परत मागताही येत नसेल, तर स्वाभिमान कुठेतरी बाजूला ठेवला आहे, अशी घणाघाती टीका रोहित पवारांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ