Satara| सज्जनगड रस्त्यावरील घाटात दरड कोसळली, सज्जनगड घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

साताऱ्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असलेल्या सज्जनगड रस्त्यावरील घाटात डोंगराची मोठी दरड कोसळली.रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे ही दुर्घटना घडली. दरड थेट रस्त्यावर आल्यामुळे सज्जनगड घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे सज्जनगडाकडे जाणारी आणि येणारी सर्व वाहतूक जागीच ठप्प झाली. तर दर्शनासाठी आलेले भाविक आणि पर्यटक रस्त्यावरच अडकून पडले आहेत.

संबंधित व्हिडीओ