AC मध्ये बसून टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं, 'NDTV'शी बोलताना जयकुमार गोरेंचा विरोधकांवर पलटवार

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज NDTV मराठीच्या गणरायाचे दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तर काहीजण एसीमध्ये बसून फक्त मागण्या करत असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.यावेळी जयकुमार गोरे यांनी दुष्काळी परिस्थितीवर सरकार आवश्यक ते निर्णय घेत असून विविध जीआर काढून मदतीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत विरोधक कोणत्या मागण्यांसाठी मोर्चे काढत आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी दुष्काळासारख्या गंभीर विषयावर राजकारण करू नये, असे आवाहन केले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ