Latur Crime News| कुंडलीतील दोष काढण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार, भोंदूबाबाला अटक

लातूर शहरात कुंडलीतील दोष काढण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.. या प्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित भोंदूबाबाला अटक करण्यात आलीय... कुंडलीतील दोष काढण्यासाठी हा प्रकार करावा लागेल, अन्यथा दोष दूर होणार नाही, अशी भीती आरोपीने पीडित मुलीला घातल्याची माहिती आहे.. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास दोष निघणार नाही, अशीही भीती घातल्याचा आरोप आहे..

संबंधित व्हिडीओ