Jalgaon| नैवेद्यासोबत बैलाने गिळली तीन तोळ्यांची सोन्याची पोत, 10 दिवसांनंतर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव जिल्ह्यात एक अनोखी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पोळ्याच्या दिवशी नैवेद्यासोबत एका बैलाने तब्बल तीन तोळ्यांची, सुमारे ४ लाख ७१ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत गिळली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या वनपट येथील शेतकरी शिवाजी बोरसे यांच्या बैलाने ही सोन्याची पोत गिळल्याचे नंतर लक्षात आले. मात्र बैलजोडीतील नेमक्या कोणत्या बैलाच्या पोटात पोत गेली याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आधुनिक एक्स-रेच्या मदतीने संबंधित बैलाच्या पोटात सोन्याची पोत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून बैलाच्या पोटातून तीन तोळ्यांची सोन्याची पोत बाहेर काढली. त्यामुळे बैलाला जीवदान मिळाले असून सोन्याची पोत सुखरूप परत मिळाल्याने शेतकरी कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

संबंधित व्हिडीओ