Beed|गणेश विसर्जनावर पोलिसांचा कडक वॉच, DJ वाजवला तर थेट दाखल होणार गुन्हा;4 हजार पोलिसांचा बंदोबस्त

बीडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. डीजे बंदीचा आदेश मोडून डीजे वाजवणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. जिल्हाभरात तब्बल चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून एआय ड्रोन आणि हायटेक सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिरवणुकांवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून नियम तोडणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित व्हिडीओ