पुण्याच्या इंदापुरात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन घेतलं जातं.मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसामुळे इंदापुरातील डाळिंब उत्पादक चिंतेत सापडलाय. लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या बागा या पावसाच्या तडाख्यातून वाचवायच्या कशा? असा प्रश्न डाळिंब उत्पादकांना पडलाय.सध्या डाळिंब उत्पादकांसमोर काय संकट ओढवलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.