घाटमाथ्यावरील अतिवृष्टीमुळे कोकणात भाज्यांचे दर कडाडले आहेत! पश्चिम महाराष्ट्रातून होणाऱ्या भाज्यांच्या आवकावर मोठा परिणाम झाल्याने सर्वच भाज्या 30 ते 40 रुपयांनी महागल्या. मटार, गवार, भेंडीचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.