राज्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईचं संकटही उग्र होत आहे.16 जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जातोय.. 178 गावं आणि 666 वाड्यांची तहान टँकर भागवत आहे.धाराशिव शहरातील बऱ्याच भागात 8 ते 10 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय. अकोल्यातही महान प्रकल्पातील 25.67 टक्के जलसाठ्यात दिवसोंदिवस घट होतेय.यामुळे अकोलेकरांची चिंता वाढलीय.रत्नागिरीतही 46 लघुपाटबंधारे धरणात फक्त 41.13 टक्केपाणीसाठा शिल्लक असून रत्नागिरीत दर सोमवारी पाणीकपात केली जाणार आहे.येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे.. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा लागणार आहे.दरम्यान पाणी टंचाईवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.