रामायण चित्रपटावर विश्व हिंदू परिषदेने बंदी घालण्याची मागणी केली असतानाच अध्यात्म प्रसारक सुमेधा पटवर्धन यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. अमेरिकेत असणाऱ्या सुमेधा पटवर्धन यांनी रामायण चित्रपटाच्या कथानकावर आणि सादरीकरणावर तीव्र आक्षेप घेतला. मूळ रामायणाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेलं पुनर्लेखन असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. रावणाच्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालून रावणाचं चुकीचं उदात्तीकरण करण्यात आलंय. प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्याला बगल देण्यात आली आहे असा आरोपही सुमेधा पटवर्धन यांनी केलीय. रावणाने केलेलं सीताहरण हे केवळ शूर्पणखेच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी घेतलेला निर्णय होता, असा चुकीचा रंग चित्रपटाला देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या विकृत पुनर्लेखनामागे नक्की कोण आहे? एखादा रावण पूजक, श्रीराम द्वेष्टा की यामागे काही अवैध अंडरवर्ल्ड फंडिंग कार्यरत आहे? असा खडा सवाल सुमेधा पटवर्धन उपस्थित केला आहे.