Mumbai | जोगेश्वरी पूर्वमध्ये वीजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू | NDTV Marathi
Youth dies of electric shock in Mumbai Jogeshwari East.
गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाचा आणि ढिसाळ नियोजनाचा एक अतिशय भीषण आणि हृदयद्रावक चेहरा समोर आला आहे. जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या परिसरातील विसर्जन व्यवस्थेदरम्यान विद्युत शॉक लागून रोहित भीमसिंग राठोड या अवघ्या १९ वर्षांच्या निष्पाप तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.