'पुन्हा पाऊस ओला, पुन्हा...' राज्यात पावसाचं पुनरागमन, कोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक धरणं भरली आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

राज्यात पुन्हा पुढील आठवड्यापासून पावसाचे (Heavy Rain in Maharashtra) पुनरागमन होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परिणाणी मुंबई, उपनगर आणि कोकणात उकाडाही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. त्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुढील आठवड्यापासून पुन्हा बसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यातील अनेक धरणं भरली आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाकडून याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील काही भाग वगळता उर्वरित ठिकाणी भारतीय हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता कमी झाली असून राज्यात सर्व भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. मुंबईत ठाणे देखील पुढील आठवड्यात हलक्या पावसाला सुरुवात होईल. 
 

Advertisement