Pimpri-Chinchwad मधील 8 इंग्रजी शाळा अनधिकृत; तुमची मुलं अनधिकृत शाळेत तर जात नाहीत ना?

मुलांना कोणत्या शाळेत घालायचं असं प्रश्न पालकांपुढे असतो... आणि शाळाच अनधिकृत असेल तर... असाच प्रकार पिंपरीमध्ये घडलाय... पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली असून पालकांना मोठा इशारा दिला आहे. आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी या यादीतील शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. , या शाळांकडे आवश्यक शासन मान्यता आणि तांत्रिक कागदपत्रे नाहीत. वारंवार नोटिसा बजावूनही शाळांनी त्रुटींची पूर्तता केली नसल्याने त्यांना अनधिकृत घोषित करण्यात आले आहे. १ जूनपासून या शाळांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार असून, शाळांच्या प्रवेशद्वारावर येथे प्रवेश घेऊ नये असे फलक लावले जाणार आहेत

संबंधित व्हिडीओ