Adani Group| अदाणी पोर्ट्सची नवी झेप; 'Logistics and Supply Chain' गटात सन्मान

अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडला इंडियाज बेस्ट अॅन्युअल रिपोर्ट अवॉर्ड्स 2025’मध्ये ‘लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन’ या गटात सन्मानित करण्यात आलंय. हा पुरस्कार द फ्री प्रेस जर्नल आणि केअरएज यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो. जो अदानी पोर्ट्सच्या कार्यक्षम आणि पारदर्शक कार्यसंस्कृतीची पोचपावती आहे. कॉर्पोरेट रिपोर्टिंग क्षेत्रातील हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. कंपन्यांचं मूल्यमापन कठोर आणि बहुपदरी प्रक्रियेद्वारे केलं जातं, ज्यामध्ये माहितीची गुणवत्ता, संवादातील स्पष्टता आणि गव्हर्नन्सचे निकष तपासले जातात.

संबंधित व्हिडीओ