नसरापुरातील चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातूनच अजून दोन धक्कादायक घटना समोर आल्यात. एका नराधम आजोबाकडून नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झालाय. तर एका परप्रांतित आईस्क्रीम विक्रेत्यानं एका गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय. त्यामुळे विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलीस आणि कायद्याचा धाक उरला नाही का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय.