टीव्हीकेचे प्रमुख थलपती विजय यांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. विजय उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती असताना यात आता ट्विस्ट आला आहे. विजय यांच्याकडे बहुमतासाठी लागणारा आकडा असण्याबाबत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर साशंक असल्यामुळे राज्यपालांकडून उद्या विजय यांना शपथ दिली जाते का याबाबत आता संभ्रम वाढला आहे. विजय यांना काँग्रेस आमदारांसह 112 आमदारांचा पाठिंबा असून त्यांना आणखी 6 अधिकच्या आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे विजय हा जादुई आकडा गाठत या आमदारांच्या सहीचं पत्र देण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.