पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात आलंय.भूसंपादनाचा दर देखील निश्चित करण्यात आलाय.दर निश्चिती करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी-विक्री व्यवहारांचा आधार घेतला गेला आहे. जमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, घरे, शेड, झाडे आदी घटकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्यावर दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. आंबा, चिंच, सीताफळ यांसारख्या फळझाडांसाठीही बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे.'मात्र उदाचीवाडी गावातील शेतकऱ्याने धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय.जमीन मोजण्यासाठी सही द्यावी म्हणून शेतकऱ्याला कल्याण पांढरे नावाच्या अधिकाऱ्याने कपड्याच्या तीन जोड्या दिल्या...मुलगी पोलीस भरती करते मुलीचे देखील पोलीस खात्यात काम करून देतो, असं आमिष दाखवून सह्या घेतल्याचा शेतकऱ्याने आरोप केलाय.