Adani Group | अदाणी समूह 70 हजार कोटींची गुंतवणूक करणार, गुंतवणूक करारानंतर फडणवीसांची माहिती | NDTV

महाराष्ट्र देशातील एक उद्योग स्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोतम आहे.त्यामुळे राज्यातील सर्व महत्त्वाची ठिकाणे वाढवण बंदराशी जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.राज्यात 1 लाख 8 हजार कोटींची नवी गुंतवणूक होणार असून यामुळे '47 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यात अदानी इंटरप्रायजेसने कोळसा उद्योगासाठी 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली.यातून जवळपास 30 हजार 500 तरुणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

संबंधित व्हिडीओ