पुढचा अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट आहे तो मराठा कुणबी प्रतिज्ञापत्राबद्दल.... त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय... तो प्रश्न म्हणजे.... तुमचे पूर्वज म्हणजे त्यातल्या महिला आणि पुरूष धोतर, पटका, लुगडं किंवा चोळी घालत होते का?... आता हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे.... तुम्ही जर मराठवाड्यात राहात असाल आणि तुम्हाला सरकारच्या नव्या जीआरनुसार कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अर्जामध्ये लिहावं लागणार आहे....फक्त हाच प्रश्न नव्हे तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिल्यावर मगच मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे....आणि तुम्हाला जर मराठा कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर अर्ज कसा करायचा, किंवा त्यासाठी कागदपत्रं कुठली लागतील.... पाहुया यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट खास तुमच्यासाठी....