Harish Rana नंतर मुंबईत 85 जणांना हवंय इच्छामरण, कोणताही गंभीर आजार नसताना अर्ज सादर | NDTV मराठी

मुंबईत 85 जणांनी इच्छामृत्यू देण्याची मागणी करत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र, या अर्जांबाबत सुस्पष्ट धोरण आणि प्रक्रियेचा अभाव असल्याने पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. महापालिकेने विविध प्रभागांतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे इच्छामरणासंदर्भातील अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, या प्रक्रियेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अर्जांची पुढील निर्णय प्रक्रिया अद्याप रखडलेली आहे.इच्छामरणाबाबत वाढती अर्जांची संख्या लक्षात घेता, यासंदर्भात स्पष्ट धोरण आणि अंमलबजावणीची गरज अधोरेखित होत आहे.

संबंधित व्हिडीओ