इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हिंगोली जिल्ह्यातून होणारी हळदीची निर्यात थांबली आहे... परिणामी म्हणून हळद बाजारात हळदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे...युद्धामुळे हळदीची सुमारे तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल घसरण झाली आहे.. खरंतर हिंगोली जिल्ह्यातून लाखो क्विंटल हळद आखाती देश आणि आफ्रिके देशांमध्ये निर्यात केली जाते मात्र या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीचा फटका हळद उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बसताना दिसत आहे.