अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध थांबणार की वाढणार हा एक महत्त्वाचा प्रश्न सध्या जगासमोर आहे. ट्रम्प यांच्या चर्चेची बातमी इराणनं फेटाळून लावली आणि त्यांच्या युद्धविरामाच्या नीतीमागेही डाव असल्याचा संशय इराणकडून व्यक्त करण्यात आलाय. आणि तो संशय अगदीच चुकीचा नाही कारण अमेरिकेनं पश्चिम आशियात आपल्या महत्त्वाच्या सैन्य तुकडीला बोलावलं आहे. हे सैन्य आकाशातून काही मिनिटांत जमिनीवर पोहोचून शत्रूवर हल्ला करण्यात तरबेज आहे. त्यामुळे अमेरिका खरंच आता इराणवर निर्णायक हल्ला करणार... अमेरिका इराणवर जमिनीवरून लष्करी कारवाई करणार का पाहूया एक रिपोर्ट.