शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मंगळवारी त्यांना निरोप देण्यात आला. निरोपाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी कविता आणि कोट्या करत शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला. त्यावर नीलम गोऱ्हे चांगल्याच आक्रमक झाल्या आणि उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार पलटवार केलाय.