घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत अनेक निष्पापांचा बळी गेला होता. त्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या शहरातील अनधिकृत होर्डिंगाचा मुद्दा चांगलाच गाजला. होर्डिंग धोरण आखण्याची मागणी होऊ लागली... अखेर दोन वर्षांनी घाटकोपर दुर्घटनेचा चौकशी अहवाल विधानसभेत सादर करण्यात आलाय. हा निव्वळ अपघात नाही तर गुन्हेगारी कट आणि प्रशासकीय अपयशाचा धक्कादायक प्रकार असल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय. या दुर्घटनेला कुणाकुणाला जबाबदार धरण्यात आलंय? पाहूया.