अहिल्यानगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला असून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भेडसावत आहे.. विशेषतः कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, पारनेर आणि नगर या तालुक्यांना दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे.. नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून 4 शासकीय आणि 133 खाजगी अशा एकूण 137 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.. नगर तालुक्यातील 19 गावांतील 91 वाड्यांमधील 45 हजार लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवले जात आहे.
Ahilyanagar Drought | Water supply via 4 government and 133 private tankers; increase the number of trips: Demand by Imampur residents.