Jammu & Kashmir| बडगाममध्ये मोठी चकमक, ‘लष्कर-ए-तोयबा’चा मुख्य कमांडर मुसा ठार; फौजी मुसा कोण होता?

लश्कर-ए-तैबाचा सर्वोच्च दहशतवादी कमांडर, फौजी मुसा, ठार झाला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम येथे झालेल्या चकमकीत मुसा मारला गेला. सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री उशिरा बडगाम जिल्ह्यात एका दहशतवाद्याला ठार केले. ही चकमक खानसाहिबच्या पलमदान मुगपत्री वनक्षेत्रात झाली. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख लश्कर-ए-तैबाचा सर्वोच्च कमांडर हाशिम मुसा अशी पटली आहे. सध्या लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे. , या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त सुरक्षा दलही पाठवण्यात आले आहे. या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. फौजी मुसा कोण होता पाहूया. Jammu & Kashmir | Major encounter in Budgam; top Lashkar-e-Taiba commander Musa killed; who was 'Fauji' Musa?

संबंधित व्हिडीओ