जगात सर्वत्र वापरलं जाणारं एआय तंत्रज्ञान आता सुपर इंटेलिजन्स म्हणून ओळखलं जाईल अशी घोषणा अमेरिकन अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी केलीय. ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक घेतली. या बैठकीत एआयच्या सुरक्षितता आणि देखरेखीबाबत गुगल, अँथ्रोपिक, मेटा, ओपनएआय, एक्स-एआय आणि एनव्हिडियाच्या सीईओंनी एका करारावर स्वाक्षरी केली. यावेळी ट्रम्प यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे नाव बदलून सुपर इंटेलिजन्स म्हणजेच एसआय करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. एआयला आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिम म्हणणे योग्य नाही, असं त्यांचं मत आहे. कारण हे इंटरनेटपेक्षाही मोठे तंत्रज्ञान असल्याचं ते म्हणालेत. त्याला आर्टिफिशियल म्हणून आपण त्या तंत्रज्ञानाची मस्करी करत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. तसंच आता ही अमेरिका चीन यांच्यातली शर्यत असून अमेरिकाच या शर्यतीत आघाडीवर असल्याचंही ट्रम्प म्हणालेत.
Global News | Call it 'Super Intelligence' now, not AI; US President changes AI's name.