वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मुंढवा चौकाची पाहणी केली. त्यांनी वाहतूक पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सिग्नल यंत्रणा सुरळीत चालवण्याचे निर्देश दिले. मुंढवा-केशवनगर परिसरातील वाहतुकीची पाहणी करून कोंडी सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.