#NDTVMarathi #Solapur #Flood सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ मध्यरात्री एका रिक्षाचालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना रिक्षाचालकाने आपली रिक्षा घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे रिक्षासह चालक वाहून गेला. सतीश सुनील शिंदे (वय ३६) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी रात्रभर शोधकार्य सुरू ठेवले होते. नागरिकांनी अशा परिस्थितीत पाण्याचा अंदाज न घेता प्रवास करण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.