मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावरून धोकादायक वाहतूक सुरूच आहे, प्रशासनाने पूल बंद करूनही नागरिक बेकायदेशीरपणे त्याचा वापर करत आहेत. शिवडी-वरळी कनेक्टरच्या कामासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. मात्र, बॅरिकेड्स आणि जाळीच्या पडद्याला ओलांडून नागरिक धोकादायकपणे या खोदलेल्या रस्त्यावरून चालत आहेत. पुढील काही वर्षे हा पूल बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी.