पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा पहाटेच हिंजवडीत पाहणी दौरा केला...दोन आठवड्यापुर्वी अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या...त्याचं पालन न केल्याने आणि अद्याप विकासकामांना सुरूवात न केल्याने अजित पवार आक्रमक झाले..त्यांनी पाहणी दरम्यान हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनाही खडेबोल सुनावलेत.तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचीही त्यांनी सकाळी-सकाळीच शाळा घेतली...विकासकामांच्या आड कुणाला येऊ देऊ नका, काम वेळेत करा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात... तर सरकारला उशीराचं शहाणपण सुचलंय असा टोला सुप्रिया सुळेंनी लगालाय..