इस्रायलसह युद्धातून मोकळं झाल्यानंतर इराणमध्ये सध्या युद्धानंतरची सारवासारव सुरूय. अशात इराणवर आणखी एक हल्ला झालाय. हा हल्ला दहशतवादी संघटनेनं केलाय. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात हा हल्ला झालाय. एका कोर्टाबाहेरच्या परिसरात झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सुमारे आठ जणांचा मृत्यू झालाय. तर २२ जण जखमी झालेत. अलकायदाशी संबंधित जैल उल अद्ल या जिहादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. हा हल्ला का झाला. कसा झाला आणि यातून दहशतवाद्यांना काय साध्य करायचं होतं पाहूया एक रिपोर्ट....