Nalasopara News | नालासोपाऱ्यात चाललंय काय? तुळींज पोलीस ठाण्यात चक्क दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी

नालासोपारा पूर्वेला असलेल्या तुळींज पोलीस पोलीस ठाण्याच्या आत मध्ये ठाणे अंमलदार कक्षा मध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये पोलिसांच्या समोर फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही गटाला बाजूला केले. विशेष म्हणजे यावेळी महिला देखील एकमेकींना भिडल्या होत्या. तुकमुळे जर पोलीस ठाण्यातच हाणामारी होत असेल तर पोलीस कायदा सुव्यवस्था कशी राखणार. ? आरोपी किंवा समाज कंटकांना पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मात्र ही हाणामारी का आणि कोणामध्ये झाली याची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. याबाबत तुळींज पोलिसांनी बोलण्यास टाळले आहे.

संबंधित व्हिडीओ