Badlapur नगरपरिषदेला तहसीलदारांची कारणे दाखवा नोटीस; उल्हास नदीतील मातीच्या भरावावर प्रशासनाचा दणका

छटपूजेच्या नावाखाली बदलापुरातील उल्हास नदीपात्रात करण्यात आलेल्या अनधिकृत मातीच्या भरावाची अखेर महसूल विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी बदलापूर नगरपरिषदेला तहसीलदार कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत समाधानकारक खुलासा आणि सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा नगरपरिषदेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ