आरोपी भीमराव कांबळेला ठेचून मारा, जाळून टाका; कांबळेच्या मुलगा आणि पत्नीची प्रतिक्रिया

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे. या गंभीर गुन्ह्यामुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय. दरम्यान भीमराम कांबळेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया आलीय. भीमराव कांबळेने जिथं बाळाची हत्या केलीय त्याच जागेवर त्याला ठेचून ठेचून मारा अशी संतप्त प्रतिक्रिया भीमरावच्या पत्नी आणि मुलानं दिलीय. तर त्याला फाशी किरकोळ आहे, त्याला जाळला पाहिजे अशी मागणीही कुटुंबीयांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ