डाव्यांच्या तीन दशकांच्या सत्तेला चारी मुंड्या चीत करत सत्तेत आलेल्या ममता बँनर्जी यांनी पश्चिम बंगालवर १५ वर्ष अधिराज्य केलं.. ममता बॅनर्जी यांच्या आक्रमकतेचा धसका केंद्राला सुद्धा होता.. तसंच काँग्रेस नेतृत्वाखालच्या आघाडीतही दीदींचाच आवाज मोठा होता.. बंगालची ही वाघिण सहजासहजी शांत होणार नव्हती.. पण स्वत:च केलेल्या काही चुका ममता बॅनर्जीांना भारी पडल्या... इतक्या की ममता बॅनर्जींना थेट सत्तेवरूनच पायउतार व्हावं लागलं..