भंडाऱ्यामधल्या शासकीय नर्सिंग कॉलेज मधल्या विद्यार्थिनींना पास करतो आणि पास करण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एकाला पालकांनी चांगला चोप दिला. विद्यार्थिनींनी घडलेली घटना जेव्हा आपल्या पाल्यांना सांगितली त्यावेळेस पालक महाविद्यालयामध्ये आले. त्यांनी संबंधित शिक्षकाला गाठलं जाब विचारला आणि त्यानंतर पालकांनी या शिक्षकाची चांगलीच धुलाई केली. पाच ते सहा मुलींच्या व्हॉट्सएप वर मेसेज करून या शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली.