मोठी बातमी| NDTV मराठीच्या मोहिमेला यश, इगतपुरीच्या 9 हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या; तीन जण फरार

इगतपुरीमधील 9 हल्लेखारांच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात.तर अद्यापही तीन आरोपी फरार आहेत.फरार आरोपींपैकी एक असलेला आकाश भोईर वर याआधी हत्येचा गु्न्हा दाखल असल्याची माहिती समोर आलीय.NDTV मराठीने या प्रकरणाची बातमी लावून धरल्यानंतर 9 हल्लेखोरांना अटक करण्यात आलीय.. इगतपुरीच्या भावली धबधबा परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर स्थानिक टवाळखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.स्थानिक गुंडांच्या या टोळक्याने पर्यटकांचा तब्बल 10 ते 15 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत कारची तोडफोड केली होती आणि मारहाणही केली होती.

संबंधित व्हिडीओ